यू ट्यूबर चा फंडा

यु ट्युबर YouTube

काय आपण यु ट्यूबर आहात? प्रथम यु ट्यूबर म्हणजे काय? हे समजू सद्या यु ट्यूबवर गाजणारे व्हिडीओ आपण पाहतो .त्यांना लाईक किंवा शेअर करतो या मुळे आपला काय फायदा हा फायदा यु ट्यूबवर व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्ती किंवा यु ट्यूबला होतो.कारण आपण व्हिडीओ पाहताना जहिराती देखील पाहतो.त्यामुळे जाहिरात करणाऱ्या कंपन्या त्याचा मोबदला यू ट्यूबला व व्हिडीओ तयार करणाऱ्याला देतात.त्याला यु ट्यूबर म्हणतात.यु ट्यूबवर व्हिडीओ टाकून आपण प्रचंड पैसा कमाऊ शकतो.त्यकर्ता क्रिएटिव माईंड व मेहनत घ्यावी लागते.त्या साठी काही नियम आहेत.कसे होता येईल यशस्वी यू ट्यूबर हे वाचा.आपल्या दैनंदिन कामाचा कंटाळा आलाय तेच ते रुटीन काम करून वैताग आलाय.काही वेगळे करावे वाटते तर यु ट्यूब वर व्हिडीओ तयार करा व पैसे कमवा. व आपला छंद जोपसा व लोकप्रिय व्हा व कमाई करा.आता हेच पहा अवघा सहा वर्षाचा चिमुरडा मुलगा तो आपले दैनंदिन जीवन म्हणजे त्याचे खेळणे बागडणे पण त्याच्या आईने त्याचे खेळणे त्याची माहिती यु ट्यूब वर व्हिडीओ करून टाकले ते लोकांना कमालीचे आवडले त्याचे चॅनल लोकांना आवडले त्याचे सबस्क्रायबर एक कोटी पेक्ष्या जास्त झाले व त्याने वर्ष भरात कमावले सात कोटी रुपये हि गोष्ट 2017 सालातील आहे व त्या मुलाचे नाव रायन आहे.आपण भारतातील काही यशस्वीत यु ट्यूबर पाहूया मालेगाव चा छोटू दादा सर्वाना माहित आहे तो टीव्ही स्टार पेक्ष्या हि जास्त कमावतो व लोकप्रिय आहे.तसेंच मधुरा रेसिपी आपण पाहतो ते चॅनल हि लोकप्रिय आहे.तसेंच संदीप माहेश्वरी याचे मोटिवेशनल स्पीच आपण यु ट्यूबवरच पाहतो.थोडक्यात काय तर आपण आपले ज्ञान व मेहनत करून आपले यु ट्युब चॅनल तयार करू शकतो.त्या करता संयम हि जरुरी आहे.यु ट्यूबर बनण्याकरता खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
⭕यु ट्यूबर बनण्याकरता काय करावे?
यशस्वी युट्यूबर बनण्याकरता प्रथम आपल्या डोक्यात एकदम हटके विषय हवा त्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू शकतो त्या करता त्या विषयासंदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी. व्हिडिओ बनवताना आत्मविश्वास असावा तो योग्य रित्या सादर करावा लागेल. आपली भाषा साधी लोकांना समजेल अशी हवी. युट्यूब व्हिडिओ चा विषय बाल संगोपन ते रेसिपी,आर्थिक मोटिवेशनल किंवा शैक्षणिक माहिती असला तरी चालतो.
⭕ नोकरी धंदा सोडून युट्युबर व्हाव का ?
अनेकांना वाटते आपले दैनंदिन कंटाळवाणे नोकरी व्यवसाय सोडून व्हावे कायमचं यूट्यूबर व कमवावे भरपूर पण थांबा हा विचार चुकीचा आहे.व्हिडीओ केले कि लगेच कमाई चालू होईल पण हे चुकीचे आहे.कारण आपले चॅनल लोकप्रिय व्हावे लागेल. व आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे.तरच कमाई होईल.या करता मोठा काळ जातो.यावेळी संयम लागतो.त्यामुळे नोकरी व्यवसाय करत फावल्या वेळात व्हिडीओ तयार करू शकतो.त्यामुळे नोकरी सोडण्याची गरज नाही.
⭕कोणते तांत्रिक ज्ञान हवे?
यु ट्युबचे स्वतचे काही नियम आहेत.त्याच्या अटी आहेत.कि ज्या आपण यु ट्युबच्या अधिकृत चॅनलवर पाहता येतात.यु ट्यूबच्या गाईडलाइन चे पालन करणे आवश्यक आहे.
⭕ व्हिडिओ बनवताना कोणता सेटअप हवा किंवा तयार करावा?
यु ट्युब व्हिडीओ तयार करताना कोणताही मोठा सेट किंवा पूर्व तयारी करावी लागत नाही.त्या करता शूटिंग करण्याकरता चांगला मोबाईल हवा.एडिटिंग करण्याकरता एक लॅपटॉप हवा.तसेंच हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन हवे.
⭕यु ट्युब पैसे कसे देते?
यु ट्युब चॅनल लोकप्रिय झाल्यावर यू ट्यूबच्या अटी शर्ती पूर्ण झाल्यावर आपले चॅनल मोनीटाईज़ करावे लागेल.त्यानंतर गूगल ऍडसेन्स ला अकाउंट ऍड करावे त्यानंतर यु ट्युब आपल्या बँक खात्यात पैसे जमा करते.हे पैसे आपल्या चॅनल वर दखवल्या जाणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून दिले जातात.
⭕यु ट्यूबर होण्याकरता कोणत्या अटी असतात?
एका वर्षात आपल्या चॅनलचे किमान 1000 सबस्क्रायबर व्हावे.तसेंच चॅनलचा प्ले वाच टाइम किमान 4000 तासाचा असावा लागतो.सोबतच आपल्या चॅनलवर टु स्टेप वेरिफिकेशन असणे गरजेचे आहे.तसेंच चॅनलवर कोणताही इम्युनिटी स्ट्राईक नसावा.वरील निकष पूर्ण केल्यावर तुम्ही यु ट्यूबवर पैसे कमवन्यास पात्र ठरता.
⭕कोणती पथ्ये पाळावी?
भाषा साधी सोपी असावी.कोणतेही हिंसक भाषा नसावी.चॅनल मध्ये अश्लिल कंटेंट नसावा.व्यसन,व्यभिचार प्रचार करणारे नसावे.रिपीट कंटेंट नसावा.इतर कोणाच्या व्हिडीओचा वापर करून आपले व्हिडीओ बनवू नयेत.ऍडसेन्स अकाउंट च्या अटी मध्ये आपण 18 वर्ष पूर्ण केलेले असावे.
⭕यु ट्यूबर झाल्यावर मिळणारे प्ले बटण कधी मिळतात?
🔲सिल्वर प्ले बटण
100000 एक लाख सबस्क्रायबर
🟨 गोल्डन प्ले बटण
एक मिलिअन सबस्क्रायबर
💎 डायमंड प्ले बटण
10 मिलिअन सबस्क्रायबर
😊 कस्टम प्ले बटण
50 मिलियन सबस्क्रायबर
धन्यवाद आवडले तर शेअर करा 🙏




टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

अंगुर पेड की जाणकारी

जामुन के पेड की जाणकारी

अनार के पेड की जाणकारी